Saturday, October 5, 2013

तू आहेस का ?

प्रत्येक रात्र अशी नसते.
आधीच्या रात्री अश्या नसायच्या
अशी रात्र अजून कधीच आली नव्हती
आधी
रात्र येताना एक एक पाउल  टाकत हळुवार यायची
दिवस संपल्याची अन अगणित क्षण हातातून सुटून गेल्याची एक हुरहूर लावून जेंव्हा कातरवेळ अधिकच काळी व्हायची तेंव्हा रात्र यायची.
आकाश निळे असतानाही चंद्रकोर उगवायची तेंव्हा चांदणे पसरून मखमली पावलांनी हलकेच रात्र यायची.
वारयाच्या  हळुवार झुळुकांनी दिवसाचा ताप शांत करत रात्र पश्चिमेकडून उगवयाची
रात्र यायची ती एखादी मुलायम  दुलई होऊन साखर झोपेत अधिकच गुरफटून घेऊन
पण आज
ती येतेय काळरात्र येतेय एक शेवट घेऊन
दिवसभर संततधार पडणारा पाऊस संध्याकाळी अजूनच उन्मत्त  झालाय वाऱ्याने उग्र रूप धारण केलेय अन काळजीने माझे हृदय पोखरून गेलंय.   काय ही रात्र सांभाळून घेईल मला?
दिवस तर अंधारलेला होताच पण रात्र ही  नेहमीपेक्षा गडद काळी झालीय हा महाप्रलयाचा तर संकेत नाही  न?
माझा धीर सुटत चाललाय अन  ह्या आलेल्या वादळात मी कस्पटा समान उडून जाईल असं  वाटतंय.
इतके दिवस आधार देणारी रात्र आज अशी वैरी होऊन का येत आहे ?
माझं एकटं पण अधोरेखित करणाऱ्या ह्या रात्री मला तुझी खूप आठवण येतेय.
तू आहेस का ?

Tuesday, September 3, 2013

अंग

भरत आलेल्या , भरणाऱ्या जखमेवर  हलकेच हात फिरवावा वा  हळुवार फुंकर मारावी , स्वतःचे  काही काळासाठी नसलेले अंग पुन्हा टवटवीत होताना पहावे .  परंतु लहान सहान जखमांसाठी हे ठीकय जर हातच तुटला किंवा पाय तुटला तर तो नाही ना  पुन्हा उगवणार भरीव अंगातील हि पोकळी कशाने भरून निघावी? 

Tuesday, August 20, 2013

आजतक मेरे साथ है (खाजा परवेज़)

जो न मिल  सके वो ही बेवफा ये बड़ी अजीबसी बात है
जो चला गया मुझे छोड़ कर वो ही आजतक मेरे साथ है

जो किसी नज़र से अता  हुई, वो ही रोशनी है खयाल में
वो न आ सके  रहूँ मुन्तज़र , यह खलिश कहा थी विसाल में
मेरी जुस्तजू को खबर नहीं , न वो दिन रहें न वो रात है
जो चला गया मुझे छोड़ कर वो ही आजतक मेरे साथ है

करे प्यार लब पे गिला न हो, ये किसी किसी का नसीब है
यह करम है उसका जफ़ा  नहीं , वो जुदा भी रह के करीब है
वो ही आँख है मेरे रूबरू , उसी हाथ में मेरा हाथ है
जो चला गया मुझे छोड़ कर वो ही आजतक मेरे साथ है

मेरा नाम तक  जो न  ले सका , जो मुझे करार न दे सका
जिसे इख्तियार तो था मगर, मुझे अपना प्यार न दे सका
वो ही शख्स मेरी तलाश है , वो ही दर्द मेरी हयात है
जो चला गया मुझे छोड़ कर वो ही आजतक मेरे साथ है

Tuesday, July 16, 2013

The Rain

It rained all night.

Tuesday, June 25, 2013

दोराहा

किसीने जो पूछा सबब आंसुओं का 
बताना भी चाहो बता न सकोगे. 


Tuesday, May 14, 2013

धार

गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे
आंधळ्या आत्म्यात माझ्या सुर्य सत्याचा जळू  दे

पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटताना दर्वळू  दे

लाभूदे लाचार छाया मोठ्मोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे


सुरेश भट




Sunday, May 12, 2013

गुदगुल्या

मनुष्याला स्वतःच  स्वतःला गुदगुल्या करता आल्या असत्या तर तो आणखीन सुखी झाला असता काय?

Thursday, May 9, 2013

Residue

मेरी दुनिया के हर शय में तू बसा था 
एक मुझे छोड़ के 

चाहने लगा हूँ दुनियाको फिर से अब 
एक तुझे छोड़ के 

Saturday, May 4, 2013

अपराधी

पहाटे अचानक जाग आली , घड्याळात पाहिलं  तर ३ :३ ८  वाजले होते. दचकुन मी उठलो होतो  पण असं  काय मी स्वप्नात केलं होतं ?

मी दिवसभर विचार करत होतो काही तरी मोठा अपराध केला होता एवढंच आठवत होतं . 

आणि आताच कळालं.

वोह तुम्हारी याद थी 

I am trying hard and I know I will succeed one day, I have to otherwise I will not be there. 

All the Best Indraneel.

Thursday, April 25, 2013

मध्यंतर

आता त्याला पलीकडचे दिसू  लागले होते.
त्याच्या मनातील  चलबिचल ओसरू लागली होती. 
ओलसर भावनेने ओथंबलेले मन केंव्हाच विरून गेले होते अन त्या जागी  एक  कोरडे ठसठशीत मन घेऊन तो पुन्हा चालू लागला होता . 
डोळस मनुष्य  फसू  शकतो , बहिऱ्याला  देखील स्वच्छ ऐकू येते अन थोटा मनुष्य देखील भरभरून देऊ शकतो असे अपूर्व ज्ञान त्याला झाले होते.
त्याला त्याची मर्यादा ठाऊक होती अन क्षितीज देखील खुपसे दूर नव्हते. 
आता  तो थोडा आणखी शहाणा झाला असावा असे त्याला वाटले . 

इंद्रनील 


Wednesday, April 24, 2013

Dosto-1

There is only one thing i DREAD: Not to be worthy of my sufferings



Saturday, April 13, 2013

सबब (अदीम)




फ़ासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था
सामने बैठा था मेरे और वो मेरा न था।

वो कि ख़ुशबू की तरह फैला था मेरे चार सू
मैं उसे महसूस कर सकता था छू सकता न था।

रात भर पिछली ही आहट कान में आती रही
झाँक कर देखा गली में कोई भी आया न था।

ख़ुद चढ़ा रखे थे तन पर अजनबीयत के गिलाफ़
वर्ना कब एक दूसरे को हमने पहचाना न था।

याद कर के और भी तकलीफ़ होती थी’अदीम’
भूल जाने के सिवा अब कोई भी चारा न था।


Saturday, March 30, 2013

तुला

शल्य मनातील सांगेन तुला
तुझीच आठवण सांगेन तुला

ढळले दिवस राहिली प्रतीक्षा
तुझ्याच शपथा  सांगेन तुला

वितळलेले क्षण नाहीसा काळ 
तुझेच विचार सांगेन तुला

तुझेच दिवस रात्रीही तुझ्याच
तुझेच अस्तित्व सांगेन तुला

अव्यक्त शब्द गोठलेली भाषा
तुझ्याच कविता सांगेन तुला 

Sunday, March 24, 2013

त्य

तूच माझं स्वप्न , तूच माझं  सत्य 
आभासी जगातील माझ्या तूच आहेस मिथ्य 


तुझ्या विना माझ्या जीवनात नाही तथ्य 
तुझ्याविना माझा दूर नाही अन्त्य 

तूच आहेस माझ्या जगण्यातील सातत्य 
तुझाच विचार करत असतो मी नित्य 

तू असशील बरोबर तर जग आहे जित्य 
तुझ्या मुळेच आहे जीवनात माझ्या लालित्य 

माझ्या गीतात आहे तुझेच स्तुत्य 
माझ्या गीतात आहेच तुझेच स्तुत्य 

यादे

तनहाई  में  हम घबरा गिये
तुम्हारी यादे  किया किये 

हम से अब तुम रूठ क्यूँ  गए 
सौ सवाल का एक जवाब दिए 

कौनसी अब खता हो गयी 
क्यूँ हमसे नज़रे चुरा लिए 

ये जो लम्हें  बीते जा रहे  
फिर से न वापस मिला किये 

Saturday, February 9, 2013

कातरवेळ




दिवसाचा अंत झाल्यावर अन रात्रीच्या प्रारंभी आधी येणाऱ्या  कातरवेळी तुझी खूप आठवण येते , तो एक क्षण निभावून नेल्यास सर्व काही सुरळीत होईलसं  वाटतं  परंतू  दर दिवशी येणाऱ्या  त्या क्षणांना थोपविण्याचे सामर्थ्य माझ्या क्षीण हातात नाही अन अनेक दिवसांची ही  शृंखला देखील मला संक्षिप्त करता येत नाही ह्या असहायतेचे अजून एक गाठोडे पाठीवर लादून चाकोरी बद्ध जीवनातून मुक्त होण्याची वाट  पाहत त्याच वळणाशी  उभा आहे .