Saturday, December 3, 2011

स्वगत-४ (अनुवाद)


जीवलगा,
मळभ दाटून आलं आहे ; उत्कट चेहऱ्यावरील दाट काळ्याभोर भुवई प्रमाणे निळ्याशार आकाशात मृगाच्या कृष्ण मेघांची रचना झाली आहे.अरण्यातील अचेतन वृक्षांमध्ये व्याकूळ स्वप्नामुळे अस्वस्थ हालचाल होत आहे.तू ..तू अकल्पितपणे अदृश्य झाला आहेस.हर एक वृक्षामागे तुझा भास होत आहे. जेंव्हा मी त्या जवळ जातो तेंव्हा ती सावली पुढच्या वृक्षामागे लुप्त होते.
तू माझ्यासमोर प्रकट नाही होणार आहेस काय? तू सावरणार नाहीस काय?
समोरचं सगळंच कसं धूसर झालंय. या अरण्यातील प्रत्येक गोष्टीची बाह्यरेषा अस्पष्ट होत आहे.
सर्वत्र धुकं पसरलंय आणि त्यामध्ये तुझी आकृती कुठे अवतरते तर कुठे अदृश्य होते.
तू जाणीवेच्या तरंगावर स्वार होऊन अविरतपणे अस्थिर असल्याने ; तुला पाहु शकत नाही.
पण केवळ तुझा क्षणिक भास देखील मला अत्यानंदित करतो.
याचं काय कारण असू शकेल?
तुझाच.