Saturday, October 5, 2013

तू आहेस का ?

प्रत्येक रात्र अशी नसते.
आधीच्या रात्री अश्या नसायच्या
अशी रात्र अजून कधीच आली नव्हती
आधी
रात्र येताना एक एक पाउल  टाकत हळुवार यायची
दिवस संपल्याची अन अगणित क्षण हातातून सुटून गेल्याची एक हुरहूर लावून जेंव्हा कातरवेळ अधिकच काळी व्हायची तेंव्हा रात्र यायची.
आकाश निळे असतानाही चंद्रकोर उगवायची तेंव्हा चांदणे पसरून मखमली पावलांनी हलकेच रात्र यायची.
वारयाच्या  हळुवार झुळुकांनी दिवसाचा ताप शांत करत रात्र पश्चिमेकडून उगवयाची
रात्र यायची ती एखादी मुलायम  दुलई होऊन साखर झोपेत अधिकच गुरफटून घेऊन
पण आज
ती येतेय काळरात्र येतेय एक शेवट घेऊन
दिवसभर संततधार पडणारा पाऊस संध्याकाळी अजूनच उन्मत्त  झालाय वाऱ्याने उग्र रूप धारण केलेय अन काळजीने माझे हृदय पोखरून गेलंय.   काय ही रात्र सांभाळून घेईल मला?
दिवस तर अंधारलेला होताच पण रात्र ही  नेहमीपेक्षा गडद काळी झालीय हा महाप्रलयाचा तर संकेत नाही  न?
माझा धीर सुटत चाललाय अन  ह्या आलेल्या वादळात मी कस्पटा समान उडून जाईल असं  वाटतंय.
इतके दिवस आधार देणारी रात्र आज अशी वैरी होऊन का येत आहे ?
माझं एकटं पण अधोरेखित करणाऱ्या ह्या रात्री मला तुझी खूप आठवण येतेय.
तू आहेस का ?

Tuesday, September 3, 2013

अंग

भरत आलेल्या , भरणाऱ्या जखमेवर  हलकेच हात फिरवावा वा  हळुवार फुंकर मारावी , स्वतःचे  काही काळासाठी नसलेले अंग पुन्हा टवटवीत होताना पहावे .  परंतु लहान सहान जखमांसाठी हे ठीकय जर हातच तुटला किंवा पाय तुटला तर तो नाही ना  पुन्हा उगवणार भरीव अंगातील हि पोकळी कशाने भरून निघावी? 

Tuesday, August 20, 2013

आजतक मेरे साथ है (खाजा परवेज़)

जो न मिल  सके वो ही बेवफा ये बड़ी अजीबसी बात है
जो चला गया मुझे छोड़ कर वो ही आजतक मेरे साथ है

जो किसी नज़र से अता  हुई, वो ही रोशनी है खयाल में
वो न आ सके  रहूँ मुन्तज़र , यह खलिश कहा थी विसाल में
मेरी जुस्तजू को खबर नहीं , न वो दिन रहें न वो रात है
जो चला गया मुझे छोड़ कर वो ही आजतक मेरे साथ है

करे प्यार लब पे गिला न हो, ये किसी किसी का नसीब है
यह करम है उसका जफ़ा  नहीं , वो जुदा भी रह के करीब है
वो ही आँख है मेरे रूबरू , उसी हाथ में मेरा हाथ है
जो चला गया मुझे छोड़ कर वो ही आजतक मेरे साथ है

मेरा नाम तक  जो न  ले सका , जो मुझे करार न दे सका
जिसे इख्तियार तो था मगर, मुझे अपना प्यार न दे सका
वो ही शख्स मेरी तलाश है , वो ही दर्द मेरी हयात है
जो चला गया मुझे छोड़ कर वो ही आजतक मेरे साथ है

Tuesday, July 16, 2013

The Rain

It rained all night.

Tuesday, June 25, 2013

दोराहा

किसीने जो पूछा सबब आंसुओं का 
बताना भी चाहो बता न सकोगे. 


Tuesday, May 14, 2013

धार

गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे
आंधळ्या आत्म्यात माझ्या सुर्य सत्याचा जळू  दे

पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटताना दर्वळू  दे

लाभूदे लाचार छाया मोठ्मोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे


सुरेश भट