दिवसाचा अंत झाल्यावर अन रात्रीच्या प्रारंभी आधी येणाऱ्या कातरवेळी तुझी खूप आठवण येते , तो एक क्षण निभावून नेल्यास सर्व काही सुरळीत होईलसं वाटतं परंतू दर दिवशी येणाऱ्या त्या क्षणांना थोपविण्याचे सामर्थ्य माझ्या क्षीण हातात नाही अन अनेक दिवसांची ही शृंखला देखील मला संक्षिप्त करता येत नाही ह्या असहायतेचे अजून एक गाठोडे पाठीवर लादून चाकोरी बद्ध जीवनातून मुक्त होण्याची वाट पाहत त्याच वळणाशी उभा आहे .