अजूनही त्याच वळणावर उभा राहून तुझी वाट पाहतो.
ह्याच वळणावरून तू खूप पुढे गेला असशील पण
मी तिथेच घुटमळतो आहे.
आकाश काळ्याचं निळं होतं अन निळ्याचं काळं
पण तुझ्या ओढीची धार मात्र अजूनच तीक्ष्ण होत जाते.
वाटेवरची झाडं निष्पर्ण नग्न होतात अन पुन्हा हिरवट कोवळी होऊन वाढू लागतात.
हर एक क्षणाला मी मात्र केवळ वठून चाललो आहे
अन त्या मृत क्षणांना अमृत देण्याचं बळ कुठे असतं रे आपल्यात ?
पुढे पाउल उचलतच नाही वाटतंय सर्व शरीर गोठून गेलंय
आणि माहिती का तुला ?
त्या गोठलेल्या शरीरात ही काही जिवंत, उबदार, स्निग्ध आणि कोमल स्मृतीचिन्ह आहेत.
जे वाट पाहण्यासाठी लागणारा जीवनरस अखंडपणे स्रवत राहतात
अन ही चिन्हं तू ज्या दिलदारपणाने बहाल केलीस त्यासाठी आजन्म ऋणी रहात
वठत जायचं
इतकेच ............
No comments:
Post a Comment