आता त्याला पलीकडचे दिसू लागले होते.
त्याच्या मनातील चलबिचल ओसरू लागली होती.
ओलसर भावनेने ओथंबलेले मन केंव्हाच विरून गेले होते अन त्या जागी एक कोरडे ठसठशीत मन घेऊन तो पुन्हा चालू लागला होता .
डोळस मनुष्य फसू शकतो , बहिऱ्याला देखील स्वच्छ ऐकू येते अन थोटा मनुष्य देखील भरभरून देऊ शकतो असे अपूर्व ज्ञान त्याला झाले होते.
त्याला त्याची मर्यादा ठाऊक होती अन क्षितीज देखील खुपसे दूर नव्हते.
आता तो थोडा आणखी शहाणा झाला असावा असे त्याला वाटले .
इंद्रनील
No comments:
Post a Comment