Tuesday, May 14, 2013

धार

गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे
आंधळ्या आत्म्यात माझ्या सुर्य सत्याचा जळू  दे

पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटताना दर्वळू  दे

लाभूदे लाचार छाया मोठ्मोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे


सुरेश भट




No comments:

Post a Comment