प्रत्येक रात्र अशी नसते.
आधीच्या रात्री अश्या नसायच्या
अशी रात्र अजून कधीच आली नव्हती
आधी
रात्र येताना एक एक पाउल टाकत हळुवार यायची
दिवस संपल्याची अन अगणित क्षण हातातून सुटून गेल्याची एक हुरहूर लावून जेंव्हा कातरवेळ अधिकच काळी व्हायची तेंव्हा रात्र यायची.
आकाश निळे असतानाही चंद्रकोर उगवायची तेंव्हा चांदणे पसरून मखमली पावलांनी हलकेच रात्र यायची.
वारयाच्या हळुवार झुळुकांनी दिवसाचा ताप शांत करत रात्र पश्चिमेकडून उगवयाची
रात्र यायची ती एखादी मुलायम दुलई होऊन साखर झोपेत अधिकच गुरफटून घेऊन
पण आज
ती येतेय काळरात्र येतेय एक शेवट घेऊन
दिवसभर संततधार पडणारा पाऊस संध्याकाळी अजूनच उन्मत्त झालाय वाऱ्याने उग्र रूप धारण केलेय अन काळजीने माझे हृदय पोखरून गेलंय. काय ही रात्र सांभाळून घेईल मला?
दिवस तर अंधारलेला होताच पण रात्र ही नेहमीपेक्षा गडद काळी झालीय हा महाप्रलयाचा तर संकेत नाही न?
माझा धीर सुटत चाललाय अन ह्या आलेल्या वादळात मी कस्पटा समान उडून जाईल असं वाटतंय.
इतके दिवस आधार देणारी रात्र आज अशी वैरी होऊन का येत आहे ?
माझं एकटं पण अधोरेखित करणाऱ्या ह्या रात्री मला तुझी खूप आठवण येतेय.
तू आहेस का ?

No comments:
Post a Comment