Sunday, November 27, 2011
स्वगत-३ (अनुवाद)
जीवलगा,
मी गरीब आहे......तूच माझी संपत्ती आहेस.
अदिप्त मी ... तूच माझं तेज आहेस.
माझ्या मालकीचं असं काहीच नाहीय. अन मला कशाचीच गरज देखील नाहीय.
आणि माझ्या मालकीचं काहीच कसं असू शकेल? हा विरोधाभासच नाही का
की जो स्वतःचाच नाही आहे त्याच्या स्वतःचं काही आहे.
एखाद्या निरागस बालकासारखा मी आनंदी आहे
जे स्वतः काही कमवायला सक्षम नसतं आणि तशी त्याला अनुमती ही नसते.
माझ्याकडे काहीच नाहीय कारण मीच तुझा आहे.
मला नाहीसं व्हायचंय ; तुझाच होण्याकरीता मला माझं अस्तित्व पुसून टाकायचंय.
तुझाच.
Saturday, November 26, 2011
स्वगत-२ (अनुवाद)
जीवलगा,
एखादं दुफळी माजलेलं राज्य किती दिवस तग धरू शकेल?
द्विधा मनाने मी किती दिवस जगू शकेन? कशाविषयी?
तुझ्याविषयीच, माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या विचारांमुळेच मला थोडी स्वस्थता वाटते पण..
पण ही स्वस्थता मिळायची कशी ?
प्रबळ दावेदार शक्तींमध्ये सतत चाललेला संघर्ष असा आहे की त्याच एका मनाचं कसं दृढ आणि खोलवर
प्रेम आहे हे ते मन दुसरया मनाला पटवून देते आणि दुसरयाच क्षणी दुसरं मन पण तेच कार्य करायला सुरुवात करतं.
हा लढा बाहेरचा असता तर मला तसूभर ही चिंता वाटली नसती. जर दुसरया कुणी तुझ्यावर प्रेम करायची हिम्मत केली असती तर
किंवा केली नसती तर; दोन्ही गुन्हे सारखेच नाहीत काय? पण हा अंतर्मनातील संघर्ष मलाच कणाकणाने भस्मसात करतो आहे
आणि ह्या द्विधा मनःस्थितीने मी खचून चाललो आहे.
तुझाच.
स्वगत-१ (अनुवाद)
जीवलगा,
तुला तर माहितीच आहे की मला माझ्याशीच संवाद साधायला खूप आवडतं.
मला माझ्यातच सर्वात मनोवेधक व्यक्तीचा शोध लागला आहे.
सतत धाकधूक असायची मला की कधीतरी या स्व संवादाचे विषय संपतील ; पण आता
भीती नाही; आता तू आहेस.
मग मी बोलतोच ;माझ्याशी ; माझ्यातल्या तुझ्याशी ; आताच्या तुझ्याविषयी आणि
अनंत काळापर्यंत अस्तित्व असणाऱ्या तुझ्याविषयी.
सगळ्यात आवडत्या विषयासंबंधित सगळ्यात आवडत्या व्यक्तीशी.
अरेरे! केवळ मीच एक चित्तवेधक व्यक्ती आहे अन
तूच सगळ्यात आवडता विषय आहेस.
तुझाच.
Sunday, November 20, 2011
वळण
अजूनही त्याच वळणावर उभा राहून तुझी वाट पाहतो.
ह्याच वळणावरून तू खूप पुढे गेला असशील पण
मी तिथेच घुटमळतो आहे.
आकाश काळ्याचं निळं होतं अन निळ्याचं काळं
पण तुझ्या ओढीची धार मात्र अजूनच तीक्ष्ण होत जाते.
वाटेवरची झाडं निष्पर्ण नग्न होतात अन पुन्हा हिरवट कोवळी होऊन वाढू लागतात.
हर एक क्षणाला मी मात्र केवळ वठून चाललो आहे
अन त्या मृत क्षणांना अमृत देण्याचं बळ कुठे असतं रे आपल्यात ?
पुढे पाउल उचलतच नाही वाटतंय सर्व शरीर गोठून गेलंय
आणि माहिती का तुला ?
त्या गोठलेल्या शरीरात ही काही जिवंत, उबदार, स्निग्ध आणि कोमल स्मृतीचिन्ह आहेत.
जे वाट पाहण्यासाठी लागणारा जीवनरस अखंडपणे स्रवत राहतात
अन ही चिन्हं तू ज्या दिलदारपणाने बहाल केलीस त्यासाठी आजन्म ऋणी रहात
वठत जायचं
इतकेच ............
Subscribe to:
Posts (Atom)