मी कोशातून बाहेर आलो आणि
तुझ्या मखमली शब्दांच्या कुशीत शिरलो
त्या वेळी अशक्त कोवळ्या पंखात उडण्याचे बळ
कुठे होतं?
आणि इच्छा ही न्हवती का?
ह्या पलीकडे ही विश्व असेल
ह्याची पुसटशी जाणीव पण न्हवती.
आता तुझ्या रेशीम शब्दांचे उबदार
आच्छादन नाही तर
तळपत्या सूर्याच्या प्रखर
किरणांनी माझे पंख निष्प्राण झालेत
तेंव्हाच नव्या विश्वाची निर्मिती होत आहे
पण तिथे जाण्यास आता
पंख कुठे आहेत ?
No comments:
Post a Comment