Saturday, October 29, 2011

भास


पलीकडे जायचं की नाही ह्याच विचारात बरेच दिवस गेले. आणि श्रमून किनारयाशेजारीच राहिलो.
प्रवाहाचं भय होतंच, ते का नाकारायचं?
मग प्रश्न वगैरे जन्मू लागले आणि त्यांची गुंतवळ वाढतच गेली
आता हाच दिवस होता आणि रात्रही, त्याच्याकडे पाहताना कित्येक सूर्य डोंगरापलीकडे गेले.
सर्वत्र दाट धुकं असायचं, असायचा फक्त एकाकी संथ अखंड वाहणारा प्रवाह.
मग एकदा पलीकडच्या किनारयावर काही हालचाल जाणवली , काही अस्पष्ट पण
ओळखीचे शब्द ऐकू आले, वाटलं बोलावतंय कुणी तरी की हा भासच आहे
धाडस केलंच धैर्य एकवटून पलीकडे जायचं आणि प्रश्नांना बद्ध करायचं
जसा पैलतीर जवळ येऊ लागला तशी ती आकृती आणखीनच दृश्यमान होऊ लागली.
आणि मधुर आवाजाने बळ वाढतच गेलं.
क्षण, दोन क्षण गेले.. नियतीच जिंकणार होती पुन्हा
आता परतीचा प्रवास चालू आहे आणि प्रश्न आहेतच पुन्हा सोबतीला
तो भास होता की वास्तव?
प्रवाहात अदृश्य व्हायचं की पैलतीर गाठायचा?
नियतीवाद की इच्छास्वातंत्र्य ?

उरलेले सूर्य पण संपतील कधी तरी

No comments:

Post a Comment