Thursday, October 27, 2011

सेतू


खूप काळ लोटून गेला आहे आता.
आणि प्रत्येक क्षणाबरोबर आपण बांधलेले शब्दांचे सेतू विरल होत चालले आहेत
दोन्ही किनारे जोडणारे शब्दांचे सेतू.
आणखी काही काळाने असे काही सेतू होते हे देखील विस्मृतीत जाईल.
त्यांचे अवशेष तरी जपले जावेत का?
की ते ही प्रवाहपतीत होतील
आणि फक्त राहतील दोन किनारे
कालप्रवाहाच्या प्रारंभापासून ते अंतापर्यंत समांतर असणारे दोन किनारे

No comments:

Post a Comment